
उदयनगर (प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या करवंड येथे जनतेच्या सेवेत आज दि .१४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने त्रिषा मल्टीसर्विसेस सी.एस.सी सेंटर सुरू झाले आहे. ऑनलाईन मल्टीसर्विसेसचे उद्घाटन विजय संजय लोखंडे व त्यांची आई सविता लोखंडे यांनी केले . विजय लोखंडे हा तरुण अतिशय होतकरू ,मेहनती आहे त्यांनी लोकांच्या सेवेसाठी त्रिषा ऑनलाईन सेंटर काम करणार असल्याचं सागितलं. ही संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन गवई यांच्या संकल्पनेतून आहे. पंचक्रोशीतील नागरिकांना ऑनलाइनच्या सुविधा ह्या गावपातळीवर मिळाव्यात म्हणून त्रिषा ऑनलाईन सेंटरचे करवंड येथे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच पती काशीनाथ मोरे ,प्रवीण पैठणे, शुभम सुरडकर,संदीप गवई,सोहम आवटे,आकाश गवई अजबराव गवई,नितीन गवई तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
