Bhim Army (Bharat Ekta Mission) District President Satish Pawar’s resignation
Request sent to Maharashtra State President : भीम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली विनंती

बुलढाणा / प्रतिनिधी : जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींमध्ये महत्त्वाची बातमी समोर आली असून भीम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले सतीश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांनी हा राजीनामा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्याकडे पाठवला असून तो मंजूर करण्याची विनंतीही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी प्रदेशाध्यक्षांकडून पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे जिल्हाध्यक्ष बदलाबाबत सूचना देण्यात आली होती. या सूचनेचा आदर राखत सतीश पवार यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. आपल्या निवेदनात पवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, त्यांच्या निर्णयाचा सन्मान असल्याचे नमूद केले आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना समाधान मिळाल्याचे सांगत त्यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. पुढेही संघटनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करत राहण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. दरम्यान, या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य राजू झनके तसेच भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांनाही पाठवण्यात आली आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर नवीन बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


