
चिखली(प्रतिनिधी):-तालुक्यातील करवंडची इंगळे घराण्याची गढी ही जिल्ह्याचे वैभव आहे. असे प्रतिपादन मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. आज दिनांक 10एप्रिल रोजी करवंड येथे भेट देऊन मोहत्सवाच्या तयारीचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी करवंड मोहोत्सव समितीचे कौतुक करून करवंड येथील ऐतिहासिक वारस्याची ओळख जगाला करून दिली व शासनाच्या निदर्शनास आणून दिली त्याबद्दल मोहोत्सव समितीचे अभिनंदन केले. शिवाजी महाराजांची सासुरवाडी असलेले व स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांचे बलिदान देणारी ही भूमी असल्यामुळे शासनाने केवळ मोहोत्सव करून न थांबता ह्या वास्तूला ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळून पुरातन गढीला पर्यटणाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी गावाकऱ्यांस दिले. यावेळी त्यांच्यासोबत करवंड महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, राजे हरिरुद्र इंगळे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, राजेंद्र इंगळे, सुनील जवंजाळ यांच्यासाह करवंड ग्रामस्थाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
आमदार खरात यांच्याकडून मोहोत्सवासाठी एक लक्ष रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.


