mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Two bodies along with a bike found in Botha forest, Hiwarkhed Police Station along with a forensic team reached the spot:  बोथा जंगलात आढळले दुचाकीसह दोन मृतदेह, घटनास्थळावर हिवरखेड पोलीस स्टेशन सह फॉरेन्सिक टीम दाखल

खामगाव (प्रतिनिधी): दि.०९ बोथा जंगलात  वळण मार्गावर दोन मृतदेह आणि दुचाकी आढळली (दुचाकी क्रमांक MH 27 BP 5620)  गेल्या चार ते पाच दिवसापासून ही घटना घडली असल्याचा प्रथम अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला आहे.

दोन मृतदेहाच्या सोबत एक दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली आहे.घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, हिवरखेड  पोलीस स्टेशनचे पोलीस उपस्थित होते. हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोथा घाटातील दोन नंबरच्या गेटपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. फॉरेन्सिक  टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे.पंचनामा सुरू आहे.

बोथा येथील रहिवासी मृत सचिन  कांडेलकर हे जेसीबी ऑपरेटर होते,ते बुलढाण्यावरून काम आटोपून एका अनोळखी दुचाकी वाहनधारकाला लिफ्ट मागून गावाकडे येत असतांना  बोथा जंगलात दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी नदीत जाऊन धडकली. अशी माहिती येथील काही नागरिकांनी दिली.दोघांचाही मृत्यू बोथा जंगलात  आढळला.

दुसरी मृत व्यक्ती मुन्ना दादू जामुनकर हे  चिखलदरा येतील असल्याचे समजते , ते चार ते पाच वर्षापासून इकडे मळीयंत्र मजुरी व्यवसाय करायचे.  अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.बुलढाणा येथून  खामगाव येत  असताना दुचाकी वरचे नियंत्रण सुटलं आणि दुचाकी नदीत आदळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.  वृत्त लिहीपर्यंत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी पंचनामा करत होती. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते.अशी माहिती गावातील काही नागरिकांनी दिली. घात पात तर नाही ना   असा संशय व्यक्त केला जात आहे.पोलिस तपासानंतर कारण समोर येईल. पुढील तपास हिवरखेड पोलिस ठाणे करत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top