mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

गोवा नाईट क्लबला आग; २५ मृत्यू क्लब मालकाला अटक : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

उत्तर गोव्यातील पणजी येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले


पणजी – उत्तर गोव्यातील पणजी येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रमोद सावंत यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटले की, अरपोरा येथील आग प्रकरणाची बारकाईने पाहणी करत आहे. 25 जणांचा मृत्यू आणि 6 जण जखमी हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व जखमींना उत्तम उपचार दिले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाची मजिस्ट्रेटस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून या दुर्घटनेची कारणे समोर येतील आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top