
बुलढाणा (प्रतिनिधी): तालुक्यातील किंन्होळा येथील रहिवासी असलेला युवा तरुण अमर जाधव यांची नुकतीच पोलीस दलात नियुक्ती झाली आहे.
अमर जाधव यांचे प्राथमिक शिक्षण किंन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेत तर पुढील माध्यमिक शिक्षण त्यांनी शिवाजी हायस्कूल किंन्होळा येथे पूर्ण केले. तर पदवीचे शिक्षण त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त युनिव्हर्सिटी नाशिक येथून तर
स्वामी विवेकानंद महाविद्यालय अत्रज येथून त्यांनी एम. ए लोकप्रशासन या विषयाची पदवीत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली असून महाविद्यालयाने त्याचा सत्कार देखील केला.
घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे जेमतेम अडीच एकर शेती दोन भाऊ ,आई-वडील शेतात कष्ट करून त्यांनी त्यांच्या मुलाला घडविले .आणि खऱ्या अर्थाने आई-वडिलांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. मूकनायक वार्ता च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या यशाचे सर्वश्रेय आई-वडील आणि गुरुजी आणि मित्र परिवारांना जाते असे त्यांनी सागितले.पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
