
बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा तालुक्यातील ग्राम धाड येथील अजिंठा बुद्ध विहार धाड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण चाटे तर प्रमुख अतिथी म्हणून धाड नगरीचे प्रथम नागरिक सरपंच सावित्रीबाई सत्यवान बोर्डे तथा धाड नगरीच्या पोलीस पाटील नंदाताई प्रमोद बोर्डे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप,धुप प्रज्वलित करून प्रतिमांना हार घालण्यात आले सामुहिक बुद्ध वंदना घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात केली,कार्यक्रमाला सुरवात झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत केल्या गेले,नंतर दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे स्वागत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विहाराचे संस्थापक अध्यक्ष सुनिल नरेंद्र बोर्डे (सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी),संतोषराव जाधव (मुख्याध्यापक),जितेंद्र बोर्डे व गावातील जेष्ठ महिला उपासिका मानकर्णाबाई बोर्डे,सरुबाई थोरात,प्रयागबाई बोर्डे,लक्ष्मीबाई हिवाळे,शोभाबाई बोर्डे,संगीताबाई थोरात,वंदनाबाई बोर्डे,अरुणाबाई बोर्डे,वैशालीबाई बोर्डे,रूपालीबाई थोरात,विद्याबाई बोर्डे यांनी दहावी व बारावी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी प्राविण्यसह उत्तीर्ण झाले,यानंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी डॉ.चाटे यांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले शैक्षणिक जीवनासह व्यावसायिक जीवनाकडे पण वळा हा त्यांचा मोलाचा सल्ला होता,नीट पेपर फुटी बद्दल बोलताना डॉ.चाटे बोलत होते की ढासळून जाऊ नका अभ्यास करत रहा येणारा पर्व आपलाच आहे,विद्यार्थ्यांनी अभ्यास लक्ष पुर्वक केला पाहिजे यातच यश दडलेले आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी आभार प्रदर्शन डॉ.प्रवीण बोर्डे धर्मसेवक तथा व्यवस्थापक यांनी सर्वांचे आभार मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कबीर बोर्डे,दर्शन चव्हाण,सम्यक बोर्डे सुमित चव्हाण,सुमेधा थोरात या सर्व विद्यार्थ्यानी मेहनत घेतली या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे आई-वडील,तरुण विद्यार्थी मित्र वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे महत्वाचे,अजिंठा बुद्ध विहार धाड मार्फत असे अनेक प्रेरणादायी व धम्ममय कार्यक्रम चालतात व असे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी डॉ.प्रविण एस.बोर्डे (धम्मसेवक) मेहनत घेतात अशी सर्व पंचक्रोशीत चर्चा चालू आहे.
