mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Satish Pawar celebrated his birthday by planting trees—no cake, no banners, and no flower bouquets.

A pledge was made to plant between 500 and 1,000 trees at Bhadola: केक नाही, बॅनर नाही,पुष्प गुच्छ नाही झाडे लाऊन साजरा केला सतीश पवारांचा वाढदिवस

भादोला येथे 500 ते 1000 हजार झाडे लावण्याचा संकल्प

बुलढाणा, (प्रतिनिधी): तालुक्यातील भादोला येथे सतीश पवार यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.आजकाल वाढदिवस म्हणजे बॅनर, पुष्पगुच्छ आणि केक कापण्याची स्पर्धा. पण या सगळ्याला छेद देत सामाजिक कार्यकर्ते तथा भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी भादोला येथील रश्मीबुद्ध विहाराच्या नियोजित जागेवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला गावातील विविध वृक्षप्रेमी, तरुण आणि ग्रामस्थ,मूकनायक फाऊंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही बॅनर, फुलांचा हार किंवा देखावा न करता फक्त झाडे लाऊन वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श सतीश पवार यांनी घालून दिला.

येत्या 2 महिन्यात 500ते 1000 झाडे लावणार

यावेळी बोलताना सतीश पवार म्हणाले, “वाढदिवस केक कापून नव्हे, तर झाडे लाऊन साजरा करावा. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी किमान 1 झाड लावण्याचा संकल्प करावा.” रश्मीबुद्ध विहार भादोला येथील नियोजित जागेवर विविध प्रकारची फळझाडे, सावलीची आणि औषधी झाडे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

येत्या दोन महिन्यात भादोला आणि परिसरात 500 ते 1000 हजार झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.

शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन 

वृक्षारोपणासोबतच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. “निसर्ग वाचला तर शेतकरी वाचेल. म्हणून झाडे लावणे आणि शेतकऱ्यांना आधार देणे, हीच खरी समाजसेवा आहे,” असे ते म्हणाले.

ना बॅनर, ना पुष्पगुच्छ – फक्त झाडे”  

सतीश पवार यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “आजच्या तरुणांनी सतीश पवारांचा आदर्श  घ्यावा. वाढदिवस साजरा करायचा तर झाडे लाऊन करावा,” अशी प्रतिक्रिया उपस्थित वृक्षप्रेमींनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी तसेच मूकनायक फाउंडेशन ग्रुप ने परिश्रम घेतले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top