
जिल्हाध्यक्षपदी सुरेश डवरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप कस्तूरे, कार्यकारी सदस्यपदी दिलीप खरात तर महासचिवपदी आदर्श शिक्षक सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुरेश माधवराव जाधव याची नियुक्ती
बुलढाणा (प्रतिनिधी) : दि बुध्दिस्ट सोसायटी अॅाफ इंडीया अर्थात भारतीय बौध्द महासभा, या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महामानव विश्वरत्न डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीयअध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे राष्ट्रीयध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चालत असलेल्या भारतीय बौद्ध महासभेची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी १८ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित बुलडाणा येथील जीवन विमा निगमचे मा.अधिकारी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीसी व सामाजिक, धार्मिक, राजकीय, कर्मचारी संघटनेची एकनिष्ठ असलेले समाजीक चळवळीसाठी मोडेल पण वाकनार नाही असे व्यक्तिमत्त्व असलेले प्रशासकीय सेवेत होते
तरी त्यांनी प्रशासकीय सेवा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे समाजसेवा हिच इश्वर सेवा समजणारे सुरेश लक्ष्मण डवरे यांची निवड भारतीय लोकशाही प्रक्रियेतून गुप्त मतदानाने करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सवणा तालुका चिखली येथील धम्मसेवक प्रदिप श्रीराम कस्तूरे, बुलडाणा येथील आदर्श शिक्षक मुख्याध्यापक कमलाकर जयवंत काकडे, महासचिवपदी आदर्श शिक्षक केंद्र प्रमुख सुरेश माधवराव जाधव, मुख्य संघटकपदी मुख्याध्यापक गणेश गवणा इंगळे, कोषाध्यक्षपदी सिध्दार्थ सुभाष खिल्लारे, सहसंघटकपदी लोणार येथील वामन मारोती केव्हळ, पोफळी ता.मोताळा येथील श्रीकृष्ण सुगदेव सुरडकर संस्कार प्रमुखपदी, घाटबोरी ता.मेहकर येथील शेषराव पुंडलिक अंभोरे सह संस्कार प्रमुखपदी, नांद्राकोळी येथील समाजसेवा समाधान हरिभाऊ जाधव यांची बुध्द विहार समन्वयकपदी, जिल्हा सदस्यपदी शेगाव येथील सुशिल सुपडा जाधव, बोराखेडी बाबरा ता.देऊळगावराजाचे समाजभूषण गोल्डनमॅन डॉ.दिलीप ब्रम्हाजी खरात, जांभेरा ता. चिखली येथील रामदास तुकाराम मलवार, वडाळी ता. सि.राजा येथील विजय मुकुंदा अंभोरे,नागणगाव ता. दे. राजा येथील सुनंदा सुधाकर बनसोडे याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
बुलढाणा येथे भारतीय बौध्द महासभेची जिल्हा बैठक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बुधांजी वाढविंदे, महासचिव हेमंत जी. जाधव, राज्य विहार समन्वयक आदर्श शिक्षक निरंजन जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती.
यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते. भारतीय लोकशाहीच्या नियमाप्रमाणे गुप्त मतदान घेऊन वरिल कार्यकारणीची निवड करण्यात आली. सर्व कार्यकारिणी ही सामाजिक, राजकीय, धार्मिक आंबेडकरी चळवळीसी बांधीलकी असलेलेली व डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्यावर प्रेमकरणारी व एकनिष्ठ आहे. संघटनेच्या नियमानुसार पूढील अंतीम मंजूरातीसाठी वरिष्ठांची मंजुरात घ्यावी लागते म्हणून संघटनेचे राष्ट्रीयध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांचेकडे पाठविण्यात आली व त्यावर विचारविनीमय करून त्यांच्या आदेशानुसार गुरुवार, दि.१८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बुधाजी वाढविंदे, महासचिव हेमंद जी. जाधव यांच्या सहीने वरील जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
