mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Buldhana district tops the state in the 10th examination; First in the division with 93.95 percent results : बुलढाणा जिल्ह्याचा दहावी परीक्षेत राज्यात झेंडा; ९३.९५ टक्के निकालासह विभागात प्रथम

बुलढाणा दि.8 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.९५ टक्के लागला आहे.

याउलट वाशीम जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.०४ टक्के नोंदविण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालामध्ये सिंदखेड राजा तालुक्याने ९७.६७ टक्के निकालासह अव्वल स्थान मिळविले, तर नांदुरा तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८९.३६ टक्के लागला आहे.

जिल्ह्यात परीक्षेसाठी एकूण ४० हजार ०३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ६७८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले. यामधून ३७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९२.३४ टक्के, तर मुलींचा निकाल ९५.९६ टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

विद्यार्थ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

प्रकार

मुले

मुली

एकूण

नोंदणीकृत विद्यार्थी

२२,१६२

१७,८७६

४०,०३८

परीक्षेस प्रविष्ट

२१,९६७

१७,७११

३९,६७८

उत्तीर्ण विद्यार्थी

२०,२८५

१६,९९६

३७,२८१

उत्तीर्ण टक्केवारी

९२.३४%

९५.९६%

९३.९५%

तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

  • सिंदखेड राजा – ९७.६७%
  • बुलढाणा – ९६.७१%
  • देऊळगाव राजा – ९६.६१%
  • चिखली – ९६.२२%
  • लोणार – ९५.८०%
  • मेहकर – ९४.५६%
  • मलकापूर – ९२.५३%
  • खामगाव – ९२.४२%
  • मोताळा – ९१.८२%
  • शेगाव – ९१.५९%
  • संग्रामपूर – ९०.५५%
  • जळगाव जामोद – ९०.४८%
  • नांदुरा – ८९.३६%

जिल्ह्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विभाग, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top