mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Gautam Jadhav passed NET in Public Administration: गौतम जाधव लोकप्रशासन विषयात नेट उत्तीर्ण

बुलढाणा / प्रतिनिधी 

तालुक्यातील  सावळी येथील गौतम तोताराम जाधव विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय  पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) लोकप्रशासन या विषयात उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये देखील घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे गौतम जाधव कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता स्वयंम अध्ययन करून नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top