महिलांच्या शिक्षण व सक्षमीकरणाचा संदेश

बुलढाणा (प्रतिनिधी): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने हे होते. त्यांनी मुलीच्या शिक्षण वर भर दिला व आज सर्वच क्षेत्रात महिला व मुलीनि उंच भरारी घेतलेली दिसून येत आहे. अशीच मुलींची भरभराटी व प्रगती व्हावी असे विचार व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. शीला रोकडे दाभाडे, प्रा. डॉ. किसन वाघ, प्रा. सरला ताजने, प्रा. सुनीता गायकी होते .
प्रा. डॉ. शीला रोकडे दाभाडे आपल्या स्वरचित“ञानज्योती सावित्रीबाई ”या कवितेतील सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा गौरव करत महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व, महिलांचे अधिकार आणि समाजातील महिलांची भूमिका याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि समाजातील अडथळ्यांना न घाबरता मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान यांची आठवण करून देत त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रा. सुनीता गायकी व डॉ. मनीषा राऊत तसेच प्रा. विणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर भादक्कर यांनी केले तसेच आभार प्रदर्शनही त्यांनीच व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


