mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Women Empowerment and Future Cancer Risk Awareness Program Completed :महिला सक्षमीकरण व Future Cancer Risk जनजागृती कार्यक्रम संपन्न

बुलडाणा (प्रतिनिधी) : महिला दिनानिमित्त परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, हैप्पी रिवर कम्युनिटी आणि आभाळमाया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व फ्यूचर केंसर रिस्क जनजागृती या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, कर्करोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करणे तसेच वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित महिलांना आरोग्यपूर्ण आणि सशक्त भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थचे अध्यक्ष गजानन राऊत, विवेकानंद अर्बनचे अध्यक्ष बारोटे सर, परिवार अर्बनचे मधुकर सावळे, विमल सावळे,आभाळमाया संस्थेचे अध्यक्ष अमोल देशमुख हैप्पी रिवर कम्युनिटी  च्या माधुरी वाघमारे तसेच , हैप्पी रिवर कम्युनिटी चे सहसंस्थापक अनुप गवळी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी महिलांच्या आरोग्य, सक्षमीकरण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी “सशक्त स्त्री, समृद्ध समाज” हा संदेश देत महिलांच्या सशक्तीकरणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top