राजर्षि शाहू महाराजांनी वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – प्रा. कडूबा पैठणे

खामगाव/ प्रतिनिधी
राजर्षि शाहू महाराजांनी वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असे प्रतिपादन प्रा. कडुबा पैठणे यांनी केले. ६ मे रोजी राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी रामटेक,येथून स्थानिक.चौकशी समिती आली असता पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. पाहुण्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संजय आराख यांनी सत्कार केला.यावेळी उपस्थित स्थानिक चौकशी समिती चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जैन, अविनाश फुसाटे (अधीक्षक), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आराख, प्रा. कडुबा पैठणे, अजय महाराज कोल्हे, विशाल गवई, (ग्रंथपाल) प्रा. दत्तात्रय शेजोळ, रेवती ठाकरे, अनिकेत आराख, ऋषिकेश आराख, दिपाली आराख, शिवानी इंगळे, श्वेता इंगळे, सहदेव वाघ उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. पैठणे म्हणाले की, राजश्री शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे स्थापन केले होते. मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीत आरक्षण सुद्धा जाहीर केले होते. जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. महात्मा फुले यांच्या विचारांचे ते पाईक होते. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रोत्साहन देऊन सामाजिक क्रांतीला वेग देण्याचं कार्य राजर्षिr शाहू महाराजांनी केले आहे. लोककल्याणकारी, समतावादी आणि रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी ६ मे रोजी साजरी केली जाते. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, आणि जातीभेद निर्मूलनासाठी ऐतिहासिक कार्य केले. ६ मे १९२२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. ज्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले जाते त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनासाठी अनेक कायदे केले आहेत. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण देणारे ते पहिले राजे होते. शेतकर्यांच्या पाण्याचे प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी सोडवले आहेत अशीही माहिती प्रा. कडुबा पैठणे यांनी दिली.

67betgame looks promising! Loads of games to choose from. The graphics are slick too. Gonna have a good session tonight, I reckon. Find it here: 67betgame