mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Buldhana Government Medical College renamed as ‘Rajmata Jijau Government Medical College’; Approval from Medical Education Department: बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’म्हणून नामकरण; वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

बुलढाणा दि.29 (प्रतिनिधी) : बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने 28 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मान्यता दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असून, त्यांचे जीवन राष्ट्रप्रेम, त्याग आणि लोककल्याणाच्या उच्च आदर्शांनी परिपूर्ण होते. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा गौरव म्हणून या महाविद्यालयाचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम नेतृत्वाने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली, त्यामुळे त्यांच्या नावाने ही संस्था ओळखली जाणे हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. यासंदर्भातील आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून प्रसिद्ध करण्यात आले असून, यामुळे आता या महाविद्यालयाची अधिकृत ओळख ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ अशी झाली आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top