mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Pandit Deendayal Upadhyay Employment Fair organized:  पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

खाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

बुलढाणा, दि. 6  : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच STEP अंतर्गत अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा दि. १२ मे २०२६ रोजी, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, पाळणा घर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळाव्यात वैभव एंटरप्रायजेस अंतर्गत अंकित पल्प मानसार, विशल्य प्रिं्टमन नागपूर, संविजय इन्फ्रास्टक्चर बुटीबोरी, अपेक्स क्नीव्स नागपूर, असरोफॅब मशिनरीज नागपूर तसेच विराज प्रोफाइल मुंबई आदी नामांकित उद्योग समूह सहभागी होणार असून त्यांनी विविध रिक्त पदांची अधिसूचना दिली आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार असून प्राथमिक निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच काही उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

रोजगार इच्छुकांनी स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करून कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मुलाखत द्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ग. प्र. बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक (०७२६२) २४२३४२ वर संपर्क साधावा.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top