mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Placement drive for private job aspirants on June 10th and 11th:खाजगी नोकरी इच्छुकांसाठी १० व ११ जून रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह

बुलढाणा,दि.9 (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या पुढाकाराने १० व ११ जून २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बुलढाणा येथे, तर दि. ११ जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव येथे हा रोजगार मेळावा होणार आहे. या उपक्रमात टाटा मोटर्स, पुणे तसेच वन एशिया, खामगाव यांसारख्या नामांकित कंपन्यांनी त्यांच्या रिक्त पदांची अधिसूचना दिली असून, रोजगार इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मेळाव्यात कंपनी प्रतिनिधींकडून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधीही मिळणार आहे.

१० वी, १२ वी, आयटीआय आणि पदवीधर पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार बुलढाणा किंवा खामगाव येथील कोणत्याही एका ठिकाणी सकाळी १० वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व गरजू उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. जी. पी. बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या (०७२६२) २४२३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top