mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Demand for the suspension of Maroti Thorve, Assistant Headquarters Officer at the Sindkhed Raja Land Records Office, following a thorough departmental inquiry! : सिंदखेडराजा भूमि अभिलेख कार्यालयातील सहाय्यक मुख्यालय अधिकारी मारोती थोरवे यांची सखोल खातेनिहाय चौकशी करून निलंबन करण्याची मागणी !

सिंदखेडराजा (प्रतिनिधी ): भूमी अभिलेख कार्यालयांत शेतकऱ्यांशी सर्वात उर्मटपणाने वागणारे ‘  सहाय्यक मुख्यालय पदावर कार्यरत असलेले व माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे नेहमी म्हणणारे मारोती थोरवे यांच्या कार्य काळामध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोजणीची सखोल चौकशी करून त्यांच्या खात्याची जिल्हास्तरीय तीन सदस्य समितीमार्फत खातेनिहाय चौकशी करून निलंबन करण्याची मागणी जिल्हा भूमी अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देविदास पिराजी सरकटे यांनी दिनांक १८ जून रोजी दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे , त्यांनी तक्रार अर्जामध्ये नमूद केली आहे की अनेक गोपनीय माहिती अनेक गोपनीय शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाले असून सहाय्यक मुख्यालय पदावर असणारे मारोती थोरवे कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांशी उद्धटपणे बोलतात ‘ शिवाय जाणून-बुजून शेतकऱ्यांची कामे केवळ लालचे पोटी अडवले जातात , आतापर्यंत अनेकांचे प्रकरणे अडवली असून काहींचे प्रकरणे पंधरा दिवसातच निकाली काढण्याचे काम सुरू आहे ‘

त्यामुळे मोठे गौड बंगाल त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या मोजणी मध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यताही नाकारता येत नसून खातेनिहाय चौकशीच्या माध्यमातून सर्व काही बाहेर येईल ‘ त्यामुळे ते रुजू झाल्यापासून त्यांनी केलेल्या मोजणीची तपासणी करून त्यांचे खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन करावे अशी मागणी सुद्धा पत्रकार सचिन खंडारे व देविदास सरकटे शेतकरी नेते यांनी  जिल्हा भूमी अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे केली आहे

सदर तक्रार अर्ज महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा . महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य ‘उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय अमरावती ,आमदार संजय गायकवाड  यांना सुद्धा देण्यात येणार आहे . त्यामुळे चौकशी न झाल्यास जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे ‘ त्यामुळे तक्रार अर्ज आला महत्त्व प्राप्त झाले आहे .

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top