mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A type of witchcraft in mud revealed: FIR filed under the Superstition Eradication Act for throwing lemons in front of houses: चिखलीत जादूटोणाचा प्रकार उघड: घरासमोर लिंबू टाकल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली FIR दाखल

चिखली(प्रतिनिधी): तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील परिसरात घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

मकरध्वज खंडाळा येथील २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने २३ मे २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, दि. १७ मे २०२६ रोजी पहाटे ५:१३ वाजता त्यांच्या घराच्या व्हरांड्यात कोणीतरी एक पूर्ण लिंबू व एक अर्धा कापलेला लिंबू टाकला. पत्नीने फोनवरून ही माहिती दिल्यानंतर तक्रारदाराने घरासमोर लावलेल्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली.

CCTV फुटेजमध्ये गावातीलच एका व्यक्तीने पहाटे लिंबू टाकताना दिसल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. अघोरी प्रथा व अनिष्ट प्रकार करून कुटुंबाला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई : या प्रकरणी चिखली पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३_ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. FIR क्रमांक ०४४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार श्यांता मारोती मगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भुषण  गावंडे यांनी FIR नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.या कायद्यानुसार दोषी आढळल्यास ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

पोलिसांचे आवाहन : अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजात दहशत पसरवणाऱ्या घटनांना आळा बसावा यासाठी नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top