mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Anger over shared news – Social activist receives death threat from an unknown person; NCR registered in Chikhali: बातम्या शेअर केल्याचा राग – सामाजिक कार्यकर्त्याला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, चिखलीत एनसीआर दाखल

चिखली (प्रतिनिधी):शेलगाव जहागीर येथील शेतीच्या वादावरून बौद्ध महिलेवरील हल्ल्याची बातमी व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याचा राग मनात धरून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांना अज्ञात xxx क्रमांकावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर क्रमांक 0653/2026 दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रशांत अविनाश डोंगरदिवे, रा. माळीपुरा, चिखली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 05/07/2026 रोजी दुपारी 1:15 वाजता त्यांच्या मोबाईल अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने डोंगरदिवे यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 

तक्रारदाराने नाव विचारले असता समोरच्या व्यक्तीने नाव सांगण्यास नकार दिला. यापूर्वीही त्याच व्यक्तीने  …….xxx या क्रमांकावरून फोन केल्याचे डोंगरदिवे यांनी सांगितले. शेलगाव जहागीर येथील घटनेची बातमी त्यांनी विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती, त्याचा हा राग असल्याचे दिसते.ही तक्रार दुपारी 3:15 वाजता चिखली पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाली. 

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352 , 351(2) – गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

व्यवस्थेला प्रश्न आहे ,एकीकडे शेलगाव जहागीर सारख्या घटनेवर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यालाच धमक्या येत असतील, तर समाजात सत्य बोलणाऱ्याची अवस्था काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

“बातमी शेअर करणे हा गुन्हा नाही. जर आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही अधिक जोराने बोलू” अशी प्रतिक्रिया तक्रारदार प्रशांत डोंगरदिवे यांनी दिली

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top